माझ्या हृदयाचे स्वप्न मी ऊधार दिले होते,
तुझ्या पायातील काटे मी साभार घेतले होते,
तेच काटे आजही माझ्या हृदयात सलतात.
अन आजही तीच स्वप्न तुझ्या डोळ्यात बोलतात
Posted in चारोळी
रिस्क
दारु पिताना मी कधीच रिस्क घेत नाही
मी संध्याकाळी घरी येतो तेंव्हा बायको स्वयंपाक करत असते,
शेल्फमधील भांड्यांचा आवाज येत असतो,
मी चोरपावलाने घरात येतो,
माझ्या काळ्या कपाटातून बाटली काढतो,
शिवाजीमहाराज फोटोतून बघत असतात,
तरी या कानाचा त्या कानाला पत्ता लागत नाही
कारण मी कधीच रिस्क घेत नाही. ॥१॥
वापरात नसलेल्या मोरीतल्या फळीवरून मी ग्लास काढतो,
चटकन एक पेग भरून आस्वाद घेतो,
ग्लास धुवून पुन्हा फळीवर ठेवतो,
अर्थात बाटलीही काळ्या कपाटात ठेवतो,
शिवाजीमहाराज मंद हसत असतात,
स्वयंपाकघरात डोकावून बघतो,
बायाको कणीकच मळत असते,
या कानाचा त्या कानाला पत्ता लागत नाही
कारण मी कधीच रिस्क घेत नाही. ॥२॥
मी: जाधवांच्या मुलीच्या लग्नाचं जमलं का गं?
ती: छे! दानत असेल तर मिळेल ना चांगल स्थळ!
मी परत बाहेर येतो, काळ्या कपाटाच्या दाराचा आवाज होतो,
बाटली मात्र मी हळूच काढतो,
वापरात नसलेल्या फळीच्या मोरीवरून ग्लास काढतो,
पटकन पेगचा आस्वाद घेतो,
बाटली धुवून मोरीत ठेवतो,
काळा ग्लासपण कपाटात ठेवतो,
तरी या कानाचा त्या कानाला पत्ता लागत नाही
कारण मी कधीच रिस्क घेत नाही. ॥३॥
मी: अर्थात जाधवांच्या मुलीचं अजून काही लग्नाचं वय झाल नाही?
ती: नाही काय! आठ्ठावीस वर्षांची घोडी झालीये म्हणे….
मी: (आठवून जीभ चावतो) अच्छा! अच्छा!…
मी पुन्हा काळ्या कपाटातून कणीक काढतो,
मात्र कपाटाची जागा आपोआप बदललेली असते,
फळीवरून बाटली काढून पटकन मोरीत एक पेग भरतो,
शिवाजीमहराज मोठ्याने हसतात,
फळी कणकेवर ठेवून शिवाजींचा फोटो धुवून मी काळ्या कपाटात ठेवतो,
बायको ग्यासवर मोरीच ठेवत असते,
या बाटलीचा त्या बाटलीला पत्ता लागत नाही,
कारण मी कधीच रिस्क घेत नाही. ॥४॥
मी: (चिडून) जाधवांना घोडा म्हणतेस? पुन्हा बोललीस तर जीभच कापूनं टाकेन तूझी…!
ती: उगाच कटकट करू नका… बाहेर जाऊन गप पडा…
मी कणकेमधून बाटली काढतो, काळ्या कपाटात जाऊन एक पेग मळतो,
मोरी फळीवर ठेवतो,
बायको माझ्याकडे बघत हसत असते,
शिवाजीमहाराजांचा स्वॆंपाक चालूच असतो,
पण या जाधवांचा त्या जाधवांना पत्ता लागत नाही,
कारण मी कधीच रिस्क घेत नाही. ॥५॥
मी: (हसत हसत) जाधवांनी घोडीशी लग्नं ठरवल म्हणे!
ती: (ओरडून) तोंडावर पाणी मारा!!
मी परत स्वॆंपाकघरात जातो, हळूच फळीवर जाऊन बसतो,
ग्यासही फळीवरच होता…
बाहेरच्या खोलीतून बाटल्यांचा आवाज येतो,
मी डोकांवून बघतो, बायको मोरीत दारूचा आस्वाद घेत असते,
या घोडीचा त्या घोडीचा त्या घोडीला पत्ता लागत नाही,
अर्थात शिवाजीमहाराजं कधीच रिस्क घेत नाहीत,
जाधवांचा स्वॆंपाक होईपर्यंत…
मी फोटोतून बायकोकडे बघत हसत असतो…
कारण मी कधीच रिस्क घेत नाही. ॥६॥
Posted in कवीता
मी देईन कधी हाक तुला
मी देईन कधी हाक तुला प्रिये
सांग साद मला तु देशील ना ?
खूप अडखळीची आहे वाट ही
कधी काट्यांवरी पडेल टाच ही
धडपडताना ह्या खडतर वाटेवर
सांग हात मला तु देशील ना ?
तुझ्या प्रितीचा आहे ध्यास मला
तुझ्या भेटीची आहे आस मला
कधी एकटेपणाचा होईल भास मला
सांग साथ मला तु देशील ना ?
कधी रागवेन मी तुझ्यावरती
कधी भांडेन मी तुझ्या संगती
कधी येईल दडपण या मनावरती
सांग कुशीत मला तु घेशील ना ?
मी देईन कधी हाक तुला प्रिये
सांग साद मला तु देशील ना ?
Posted in कवीता
पाऊस येडा पिसा जिवाला लावून गेला तात,
तुफान आलं सुसाट माझा करून गेला घात,
कातर वेळी करणी झाली हरवून गेला राजा . .
काजल रातीनं ओढून नेला सये साजण माझा . . .
Posted in चारोळी
सहजंच उठते तुझी पापणी
सहजंच झुकते खाली अलगद
आणि आम्ही इथे बिचारे
एका नजरेमध्ये गारद !
Posted in चारोळी
जरिही बघतो विसरून तुजला तरीही का ऎसे?
नभास म्हणतो जमीन आणिक जमीन जळ भासे,
कैफ तुझ्या स्मरणांचा कैसा अजून उतरेना,
ये ना ये ये ना ये ना ये ना ये ये ना . . . .
Posted in चारोळी
तडा तडा गार गारा गरा गरा फिरे वारा
मेघियाच्या ओंजळीत वीज थिजलेला पारा
दूरवर रानभर नाचणारा निळा मोर
मोरपिस मखमल ! ऊतू गेले मनभर !
Posted in चारोळी
ॠतुचक्राचे आस उडाले,
आकाशातून शब्द उडाले,
आवर आवर आपुले भाले,
मीन जळी तळमळले ग,
तव नयनांचे दल हलले ग . . . .
Posted in कवीता
अशा पावसात सये व्हावे तुझे येणे जाणे,
उमलते ओले रान रान नव्हे मन तुझे,
जशी ओली हुर्हुर थरारते रानभर ,
तसे नाव थरारावे माझे तुझ्या मनभर . . . .
सरीवर सर . . . .
Posted in चारोळी
प्रिये ये निघोनी घनांच्या कडेनी,
मला एकटेसे आता वाटताहे,
कुणालाच जे सांगता येत नाही,
असे काहीसे मन्मनी दाटताहे . . . . .
Posted in चारोळी