मिसळ…१
तसे मी रेग्युलर कॉलेजला जात नाही, जरा कंटाळाच येतो पहा. थर्ड सेमिस्टरला माझी प्रेसेन्टी १३% होती त्यामुळे कॉलेजने परीक्षेला बसू न देण्याचे ठरवले होते. पण थोडासा डिरेक्टरला मस्का मारून आणि कुठून कुठून मेडिकल सर्टीफिकेट आणून त्याआधारे हॉल तिकीट मिळवले होते. आणि ते घेताना डिरेक्टर पुढचा सेम रेगुलर राहा नाहीतर…..!!! नाईलाज म्हणून जावे लागत होते फोर्थ सेम ला रेगुलर कॉलेजला.
बाइक विकल्यापासून मी आणि मनोज दोघे सिटी बस ज्याला नागपूरकर स्टार बस म्हणतात त्याने जाने येणे करत होतो. मनोज रामना मारोती पासून यायचा. सकाळी बस मध्ये बसला कि मला तो मेसेज करायचा. मग मी सगळे आवरून बर्डी स्टोपवर जायचो. बस स्टोप माझ्या हॉस्टेल पासून साधारण अर्धा एक किलोमीटर असेल, तितके अंतर मी रोज पायी जात असे आणि परत प्रताप नगर स्टोप माझ्या कॉलेज पासून अर्धा किलोमीटर, तिथून परत कॉलेज पर्यंत पायी जावे लागत असे. पण प्रथमच मला कळायला लागले होते कि सिटी बस ने जाण्यात जी “मजा” आहे ती बाइक ने जाण्यात नाही. बर्डी ते प्रताप नगर यामध्ये २ शाळा आणि ३ कॉलेज लागतात त्यामुळे त्या बस मध्ये “पाखरांची” रेलचेल असायची. त्यादिवशी माझा मित्र मनोज काही कारणामुळे कॉलेजला येणार नव्हता. म्हणून मी एकटाच निघालो होतो कॉलेजला. त्या दिवशी नक्की माझ्या राशीत म्हणजे तूळ राशीत “आज तोंड सांभाळून बोला” असेच काही तरी लिहिले असणार आणि नेमके तेच माझ्या वाच्ण्यातून सुटले. शेवटी असे झाले की मनोज नसल्याने मी एकटाच होतो. आणि पहिले फाईनंस् चे लेक्चर झाले आणि माझे दुसरे एग्री बिझनेस मेनेजमेंटचे लेक्चर होणार नाही हे समजले. एरवी लेक्चर नाही म्हटले की मी सरळ हॉस्टेलवर येऊन झोप काढली असती, त्या दिवशी काय लहर आली देव जाने आणि मी लायब्ररीत पेपर वाचण्यासाठी गेलो आणि हितवाद आणि सकाळ हे पेपर चाळत बसलो. माझ्या बाजूच्या खुर्चीवर एक लाल रंगाचा पंजाबी ड्रेस घातलेली मुलगी येऊन बसली. मी सहजच तिच्या कडे पहिले. ओळखीची नव्हती. म्हणून मी विचार केला की ती जुनियर असावी. तितक्यात माझी नझर तिच्या हाताखाली असलेल्या लोकसत्ता पेपर वर गेली. मी बराच वेळ लोकसत्ता पेपर शोधात होतो, पण सापडत नव्हता आणि हिला कसा बरे एका झटक्यात सापडला आणि लोकसत्ता पेपर वाचत आहे म्हणजे मराठी आहे इतके तर समजले होते. जाऊ देत, असे म्हणत मी तिला म्हंटले
“ए शुक शुक!! जुनिअर जरा लोकसत्ता दे नां”
“हो सर, घ्या नां, आणखी कोणता पेपर हवा आहे का किंवा कोणती मेग्झीन हवी असेल तर सांगा मी देते आणून” असे म्हणताना तिच्या चेहऱ्यावर एक खट्याळ हसू होते.
“सध्यातरी तरी लोकसत्ता दे, पुढे काही लागले तर तुला एस एम एस द्वारे कळवीन!!” कुठली लढाई जिंकली अश्या थाटात मी तिच्या टोमण्याला प्रती टोमणा मारून टाकला.
शेवटी एका जुनिअरने टोमणा मारला आणि त्या टोमण्याला आपण प्रती टोमणा मारून चूप करणे म्हणजे वाघाच्या गुहेत जाऊन त्याची शिकार करून आल्या गणिक मोठेपणाची गोष्ट आहे, नाही का?? मनात एक विजयाची भावना घेऊन मी तिने दिलेला लोकसत्ता वाचत बसलो.
थोडा वेळ झाला आणि त्या मुली समोर एक दुसरी मुलगी येऊन उभी टाकली. ती मुलगी सुद्धा ओळखीची वाटत नव्हती म्हणून मला वाटले की जुनिअरच असावी. ती माझ्या बाजूला बसलेल्या मुलीजवळ आली आणि तिला म्हणाली,
“ओ म्यांम, पप्लीज असाईनमेंट्सवर साईन करा नां, मला तो बाबू हॉल तिकीट देऊन राहिला.”
“मी तुला आधीच सांगितले होते की सगळी असाईनमेंट्सवर वेळेवर दे कॉलेज सगळ्या स्टुडंट्सचा रेकॉर्ड ऑन लाईन ठेवत आहे.” ती
“सॉरी म्यांम, नेक्स्ट इअरला सगळं टायीमाववर सबमिट करेल पण आता तुम्ही साईन देऊन द्या!”
“ तुम्ही फर्स्ट इअर ची मुलेनां तहान लागली की विहीर खोदता” असे म्हणत तिने त्या मुलीच्या असाईनमेंट्सवर साईन केली आणि कुत्सीत स्माईल देत माझ्याकडे पाहिले.
ह्म्म्म्म्म!! माझ्यासाठीतर तोंड लपवायला आकाश पण कमी पडले.
नंतर मला असे समजले की ती मुलगी माझी जुनिअर नसून बी बी ए ची लेक्चरर आहे. मधल्या काळात आमच्या कॉलेजचा टीचिंग स्टाफ नवीन आला होता. आणि मी रेगुलर नसल्याने मला त्यांच्या बद्दल जास्ती माहिती नव्हती.
आज पण ती लेक्चरर माझ्यासमोरून जाताना कुत्सीत स्माईल देऊन जाते.
Posted on एप्रिल 4, 2011, in मजेदार, मराठी. Bookmark the permalink. 3 प्रतिक्रिया .

मस्त रे भाई!!!
त्या मुलीचा फोटो तरी टाक मॆलवर!!!
enjoy college life!!!
Ho mitra.. Tula na ticha photo, Patrika, Gotra, Naad, sagla mail karto!!!
hehe…popat zala……