एकदा एक शिकारी शिकार करण्यासाठी जंगलात जातो. जंगलात अचानक एक सिंह त्याच्यासमोर येतो. बेसावध शिकारिला पाहून सिंह खुश होतो. मनातल्या मनात वाघ विचार करतो की सकाळी मस्त जेवण मिळणार. सिंह पळत जाऊन शीकार्यावर झडप घालनार तितक्यात शिकारी मोबाईल कढतो आणि बोलायला लागतो
“हो, सिंह समोरच आहे. त्याची शीकार करतो आणि देतो तुमच्या कडे आणुन, मग त्यच्यामध्ये कापुस भरुन ठेवा बैठकीत.”
हे ए॓कून सिंह घाबरतो आणि पळुन जातो. तो पळत असताना त्याला रस्त्यात एक कोल्हा भेटतो. कोल्हा घाबरलेल्या सिंहाला पाहुन विचारतो,
“महाराज, आपण का ईतके घाबरले आहात?? आणि पळत का आहेत??”
सिंह कोल्ह्याला सगळी कहानी सांगतो, यावर कोल्हा सिंहाला पटवुन देतो की शिकारीने त्याला कसे मुर्ख बनवले आहे. यावर सिंह म्हणतो,
“पहा कोल्ह्या आता त्या शिकर्याला कसा मारुन कच्चा खातो ते.”
कोल्हा म्हणतो, ” महाराज मी पण येतो तुमच्या सोबत.”
ईकडे आपल्या युक्तीवर खुष असलेला शिकारी सिंहासोबत कोल्ह्याला येताना पाहुन आश्चर्यचकीत होतो. त्याला समजून जाते की सिंहाला कोल्ह्याने पट्टी पढवली आहे. जसे कोल्हा आणि सिंह जवळ येतात तसे शिकारी कोल्ह्याकडे पाहुन म्हणतो की,
“तुला सांगितले होते ना की दोन सिंह शोधुन आण, हे काय तू एकच सिंह आणलास??”
हे ए॓कून सिंह कोल्हा काही बोलायच्या आतच त्याच्या एक थोबाडीत देतो आणि परत पळुन जातो.
मोरल ऑफ द श्टोरी: शिकारीला जातानासुध्दा मोबाईल जवळ बाळगावा.
(या शिवाय जर आपल्याला जर दुसरे “मोरल” ठाऊक असेल तर अवश्य कळवावे… 🙂 )
very nice
Dhanyawaad Dipak!!!
हा हा .. लय भारी !!
intelligent….phakt surwatila ekda chukine wagh lihile aahe ,tithe phakt sinh paahije….but overall very gud
changlich khechli